Tuesday 21 April 2015

"विद्या विनयेन शोभते"


श्री. भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळ ची  स्थापना इ.स. १९५३ साली गावातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या द्वारे झाली. विद्यालयामध्ये  ५ वी ते १२ वी पर्यंतचे मराठी माध्यमातून तसेच इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिश मधूनही शिक्षण दिले जाते.  ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा व्यवसाय पूर्व अभ्यासक्रम चालवला जातो. ११-१२ वीसाठी कला, वाणिज्य, शास्त्र, शेती शास्त्र शाखेसोबतच एम.सी.व्ही.सी. हि शाखा उपलब्ध आहे. पाबळ पंचक्रोशीतील प्रती वर्षी जवळपास २००० ते २५०० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

प्रशालेच्या भव्य इमारतीसह क्रीडांगण, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, इ. गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी शाळा उपलब्ध करून देत असते. उदा. गटपातळी वरील क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन प्रशाला करते. विद्यार्थी स्कोलर्शीप, एलेमेनट्री, एन्टर्मेजिएट चित्रकलेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हि भाग घेतात आणि यश मिळवतात. कबड्डी, खो-खो आणि लेझीम यांनी नेहमीच क्रीडांगण गाजवले आहे.

१ ली ते ४ थी चे प्राथमिक शाळेचे वर्ग स्वतंत्र इमारतीत चालतात; 

गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध आहे, विद्यार्थी १२ वी नंतर   श्री . पद्ममणी जैन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पूर्ण करतात. महाविद्यालयाची भव्य इमारत आणि क्रीडांगण गावापासून १कि.मी. अंतरावर आहे.